दिनकरन समर्थक 22 आमदारांनी पलानीस्वामी सरकारचा पाठिंबा काढला
चेन्नई, दि. 23, ऑगस्ट - दिनकरन समर्थक 22 आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने तामिळनाडूतील अण्णा द्रमुकच्या पलानीस्वामी सरकार धोक्यात आले आहे. या 22 आमदारांनी राज्यपाल के . विद्यासागर राव यांची भेट घेऊन आपण पलानीस्वामी सरकारचा पाठिंबा काढत असल्याचे पत्र सादर केले. दरम्यान द्रमुक चे विधिमंडळ पक्ष नेते स्टॅलिन यांनी विधानसभेत पलानीस्वामी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे. दरम्यान , दिनकरन समर्थक आमदारांना पुद्दुचेरी येथे हलवण्यात आले आहे .