Breaking News

रत्नागिरी जिल्ह्यात एक लाख 68 हजार गणपतींचे आज आगमन

रत्नागिरी, दि. 25, ऑगस्ट - सार्यांचे आराध्यदैवत असलेल्या गणरायाच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज झाला असून उद्या (दि. 25 ऑगस्ट) जिल्ह्यात एक  लाख 67 हजार 645 गणपतींचे आगमन होणार आहे. त्यामध्ये 112 सार्वजनिक गणपतींचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणावर मुंबईकर चाकरमानी कोकण रेल्वेने  दाखल होत असून एकाच दिवशी अनेक गाड्या सोडल्याने कोकण रेल्वेच्या गाड्या दोन ते पाच तास उशिराने धावत आहेत. गणेशोत्सवामुळे बाजारपेठेला चांगलीच  संजीवनी मिळाली आहे. जिल्ह्यात एक 1 लाख 67 हजार 543 खासगी आणि 112 सार्वजनिक बाप्पांचे आगमन होणार आहे. जिल्ह्यातील अठरा पोलीस ठाण्यांच्या  कार्यकक्षेतील ही आकडेवारी आहे. त्यापैकी रत्नागिरी शहरात 7,611 घरगुती तर 26 सार्वजनिक आणि रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात 9 हजार  438 घरगुती आणि एक सार्वजनिक गणेशोत्सव आहे. अन्य पोलीस ठाण्यांची आकडेवारी अशी - जयगड - 2743 घरगुती, सार्वजनिक, संगमेश्‍वर - 13,543  घरगुती, 1 सार्वजनिक, राजापूर - 19,886 घरगुती, 6 सार्वजनिक, नाटे - 7,209 घरगुती, 2 सार्वजनिक, लांजा - 13,540 घरगुती, 5 सार्वजनिक, देवरूख -  12,243 घरगुती तर 5 सार्वजनिक, सावर्डे - 10,240 घरगुती तर 2 सार्वजनिक, चिपळूण - 19,400 घरगुती तर 14 सार्वजनिक, गुहागर - 14,251 घरगुती  तर 2 सार्वजनिक, अलोरे - 5 हजार 600 घरगुती तर 4 सार्वजनिक, खेड 12,917 घरगुती तर 17 सार्वजनिक, दापोली - 6,142 घरगुती तर 9 सार्वजनिक,  मंडणगड - 4,389 घरगुती तर 6 सार्वजनिक, बाणकोट - 760 घरगुती तर 2 सार्वजनिक, पूर्णगड - 5,675 खासगी आणि 2 सार्वजनिक, दाभोळ - 1 हजार  874 खासगी, 1 सार्वजनिक. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत उत्सवासाठी चाकरमानी कोकणात दाखल होऊ लागले आहेत. कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या हाऊसफुल्ल  झाल्या आहेत. आज सर्वाधिक गाड्या धावत आहेत. त्यामुळे मुंबईहून कोकणात येणार्‍या सर्व गाड्या उशिराने धावत आहेत. सायंकाळी सहा वाजता मंगला एक्स्प्रेस  पाच तास 11 मिनिटे, नेत्रावती एक्स्प्रेस एक तास, केरळ संपर्कक्रांती एक्स्प्रेस 1 तास 36 मिनिटे, मांडवी एक्स्प्रेस 50 मिनिटे, दिवा-सावंतवाडी पॅसेंजर एक तास  21 उशिराने धावत होती. उत्सवासाठी बाजारपेठा सजल्या असून आज सर्वाधिक उलाढाल झाली.