Breaking News

दिल्लीतील ब्लू लाईन’च्या सर्व 50 मेट्रो स्थानकांवर हायस्पीड वाय-फाय सेवा

नवी दिल्ली, दि. 26, ऑगस्ट - दिल्ली मेट्रो ने आजपासून ब्लू लाईन च्या सर्व 50 मेट्रो स्थानकांवर हायस्पीड वाय-फाय सेवा सुरू करण्यात आली.
वाय-फायचा वापर करण्यासाठी प्रवाशांना नोंदणी केल्यानंतर ओय डीएमआरसी फ्री वाय-फाय चा पर्याय निवडावा लागणार आहे. द्वारका सेक्टर 21 व वैशाली /  नोएडा सिटी सेंटर या स्थानकांदरम्यान या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
या सुविधेमुळे प्रवाशांना स्थानक परिसरात सर्व मानक इंटरनेट प्लिकेशनचा वापर करता येणार आहे. पुढील 6 ते 9 महिन्यांत येलो लाईन (हुडा सिटी सेंटर -  समयपूर बादली) या मार्गावरही ही सुविधा सुरू करण्यात येईल, असे दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने (डीएमआरसी) म्हटले आहे.