Breaking News

सत्येंद्र जैन यांनी राजीनामा द्यावा - विजेंद्र गुप्ता

नवी दिल्ली, दि. 26, ऑगस्ट - मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल दाखल झाल्याने दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी राजीनामा द्यावा अथवा  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जैन यांना पदावरून हटवावे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते विजेंद्र गुप्ता यांनी आज केली. जैन यांच्याविरोधात आज प्राथमिक  माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे.
ते म्हणाले की, जैन हे आपल्या पदाचा दुरूपयोग करत आहेत. भ्रष्टाचार केल्याप्रकरणी त्यांना तत्काळ त्यांच्या पदावरुन हटवले जाणे गरजेचे आहे. भ्रष्टाचाराच्या  विरोधात असणा-या केजरीवाल यांनी जैन यांच्याविरोधात अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही याचे आश्‍चर्य वाटत आहे. जैन यांच्यावर अनेक आरोप करण्यात  आलेले असूनही केजरीवाल गप्प कसे? यावरून हे स्पष्ट होते की, आम आदमी पक्षाकडे पारदर्शकता उरलेली नाही, असे त्यांनी नमूद केले.