Breaking News

हिंसाचाराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून निषेध

नवी दिल्ली, दि. 26, ऑगस्ट - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांना न्यायालयाने बलात्कार प्रकरणी दोषी ठरवल्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराचा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केला आहे. ’हिंसाचाराच्या घटना अतिशय दुर्दैवी आणि दु:खदायक आहेत . समाजातील सर्व घटकांनी शांतता पाळावी. मी  कायदा आणि सुव्यवस्था स्थितीवर स्वात: लक्ष ठेवून आहे. केंद्रीय गृह सचिवांकडून मी परिस्थितीची माहिती घेत आहे. हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी संबंधित  अधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत असे मी सांगितले आहे, ’ असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.