पुणे महापालिकेत 500 कोटींचा घोटाळा भाजप खासदाराकडून पक्षाला घरचा आहेर निविदा प्रक्रियेची तक्रार थेट सीबीआयकडे
पुणे,दि.2 : पुणे महापालिकेवर भाजपाची सत्ता आल्यामुळे आता तरी पारदर्शक कारभार बघायला मिळेल, अशी पुणेकरांची अपेक्षा, मात्र ही अपेक्षाच फोल ठरली असून, पालिकेत 500 कोंटीचा घोटाळा झाल्याचे जाहीर केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुणे महापालिकेचा कारभार किती अपारदर्शक आणि घोटाळ्यांनी भरला आहे, याबाबतचा घरचा आहेर पक्षाचे खासदार संजय काकडे यांनीच भाजपला दिला आहे. समान पाणीपुरवठा योजनेचा प्रचंड गाजावाजा करण्यात आला. या योजनेसाठी पालिकेने कर्जरोखेदेखील उभारले. मात्र, प्रत्यक्ष काम करण्यासाठी मागवलेल्या निवीदांमध्ये चक्क 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. विशेष म्हणजे या आरोपावर खा. संजय काकडे यांनीही विरोधकांच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे.
या योजनेच्या पुर्ततेसाठी आतापर्यंत एकुण 4 टेंडर काढण्यात आली. त्यापैकी सर्व टेंडरची मिळून अंदाजपत्रकीय रक्कम 1700 कोटींच्या घरात जाते. चार टेंडरमध्ये सर्वच्या सर्व टेंडर साधारण 27 टक्के चढ्या दरांनी आली. 27 ट्क्के वाढीव दराने विचार करता या योजनेचा अंदाजे खर्च 2200 कोटींच्या घरात जातो. महत्त्वाचे असे कीह ही चार चार टेंडर भरणार्या कंपन्या मात्र तीनच. आता ही आलेली टेंडर विचारात घेऊन चढे दर दिसत असूनही असूनही टेंडर मान्य करण्याच्या तयारीत प्रशासन आहे. दरम्यान, या टेंडरबाबततच्या एकुणच व्यवहारांवर शंका आल्याने या निविदा प्रक्रियेची तक्रार थेट सीबीआयकडे करण्यात आली आहे.