Breaking News

नवप्रकाश योजना 31 ऑगस्टपर्यंत; थकबाकी भरल्यास 85 टक्के व्याजमाफी

नागपूर, दि. 29, ऑगस्ट - कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या कृषी ग्राहकांसह सर्व उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणने  आणलेल्या नवप्रकाश योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदारांना 31 ऑगस्टपर्यंत शेवटची संधी आहे.
थकबाकीदार वीज ग्राहकांसाठीच्या नवप्रकाश योजनेला गेल्या जून महिन्यात तीन महिन्यांची मुदतवाढ देऊन अंतिम तारीख 31 ऑगस्ट करण्यात आली. या योजनेत  सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना वगळता इतर ग्राहकांनी जून 2017 ते 31 ऑगस्ट 2017 या कालावधीत थकबाकीची मूळ रक्कम भरल्यास 85 टक्के व्याज व  विलंब आकाराची 100 टक्के रक्कम माफ होणार आहे.
नवप्रकाश योजनेत थकबाकीची मूळ रक्कम भरणार्या ग्राहकांना सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेस यामध्ये पूर्णपणे सूट देण्यात आली असून,  ग्राहकांना कोणत्याही प्रतिज्ञापत्राची गरज लागणार नाही. शिवाय, वीज जोडणीचा अर्ज ग्राहकांना कार्यालयात मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या योजनेत सहभागी होणार्या ग्राहकांसाठी महावितरणच्या ुुु.ारहरवळीलेा.ळप या संकेतस्थळांवर संबंधित ग्राहकाला थकीत देयकाची किती रक्कम भरावयाची आहे, याची  उपलब्ध करूंन देण्यात आली आहे. तसेच जेथे इंटरनेटची सुविधा नसेल अशा ग्राहकांना त्यांच्या थकबाकीच्या रक्कमेचा तपशील महावितरणच्या शाखा  कार्यालयापासून ते मंडल कार्यालयात तातडीने उपलब्ध करूंन देण्यात येत आहे. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या वीजग्राहकांनी या नवप्रकाश योजनेचा  लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.