Breaking News

पूरग्रस्तांसाठी 2 हजार कोटीचा मदतनिधी पंतप्रधान मोदी यांची घोषणा


गुवाहाटी,दि.2  : आसाम व ईशान्य भारतातील अन्य राज्यांमधील पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 हजार 350 कोटी रुपयांचा मदतनिधी घोषित केला आहे. आसाममधील पूरस्थितीची मंगळवारी पाहणी केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आसामचे मुख्यमंत्री आणि अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत ही घोषणा केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.  पुरामध्ये 1 हजार 60 किलोमीटरपर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे, तसेच शेतीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आज सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदी यांनी 5 राज्यांमधील पूरस्थितीची पाहणी केली. पंतप्रधानांनी आसामसाठी मदत म्हणून अतिरिक्त 250 कोटी रु. देण्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनेवाल, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू,मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बीरेन सिंग आणि नागालँडचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते.