Breaking News

देवगिरी एक्सप्रेसमधून 25 किलो गांजा जप्त

नांदेड, दि. 28, ऑगस्ट - सिकंदराबादकडून मुंबईकडे जाणार्याी एक्सप्रेसमध्ये आरक्षित स्लीपर कोच एस 11 मधील सीटखालून तब्बल 25 किलो गांजा जप्त  करण्यात आला आहे, जागरूक प्रवाशांनी तक्रार केल्याने ही कारवाई करण्यात आली. निजामाबाद येथून चढलेल्या एका प्रवाशाला चार बॅगा आढळून आल्या त्याने  चौकशी केली तेव्हा या बॅगा कोणाच्या आहेत हे कोणाच्याच लक्षात येईना. त्याने तिकिट तपासणीस व धर्माबाबद स्टेशन मास्तर यांना या प्रकाराची माहिती दिली. या  बेवारस बँगांची तपासणी केली असता त्यात सुमारे 25 किलो गांजा आढळून आला. हा सर्व गांजा रेल्वे पोलिसांनी जप्त केला. यावेळी धर्माबाद स्टेशन मास्तर मिश्रा,  अंबादास मुगल, प्रवासी सतीश हारेगावकर, आदी उपस्थित होते.