हॉकी : भारतीय कनिष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदी ज्यूड फेलीक्स
नवी दिल्ली, दि. 23, ऑगस्ट - ‘हॉकी इंडिया’तर्फे भारतीय हॉकी कनिष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदी मंगळवारी माजी कर्णधार ज्यूड फेलीक्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. . आगामी कनिष्ठ विश्वषचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. फेलीक्स हे कनिष्ठ गटातील 33 खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहेत. ‘फेलीक्स हे अनुभवी आहेत. भारतीय हॉकी संघाचे त्यांनी नेतृत्व केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ फळीतील खेळाडूंना प्रशिक्षित करणे, हा या नियुक्तीमागचा मुख्य उद्देश आहे. कारण या पुढे 2020 आणि 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कनिष्ठ फळीतील खेळाडूच वरिष्ठ संघाचे प्रतिनधित्व करतील, असे संघाचे संचालक डेव्हिड जॉन यांनी सांगितले.