दिल्ली महिला आयोगाकडून युजीसी सचिवांना समन्स
नवी दिल्ली, दि. 22, ऑगस्ट - दिल्ली विद्यापीठाच्या कक्षेतील हिंदू महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहातील शुल्काबाबत तक्रारी संदर्भात दिल्ली महिला आयोगाकडून विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) सचिवास समन्स बजावण्यात आले आहे. आयोगाने सचिवांना 28 ऑगस्ट रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. हिंदू महाविद्यालयात मुलांच्या वसतिगृहाच्या तुलनेत मुलींच्या वसतिगृहाचे शुल्क अधिक असून अन्यही काही भेदभाव करणारे नियम या महाविद्यालयात असल्याची तक्रार आयोगाकडे आली होती.
काही महाविद्यालयांमध्ये मुलींचे वसतिगृह नाही, विद्यापीठ अनुदान आयोगाकडे अनेक महाविद्यालयांचे अनुदान प्रलंबित आहे, यासारख्या बाबींसंबंधी आयोगाने ’युजीसी’शी अनेकदा पत्रव्यवहारही केला. . मात्र, ’युजीसी’ कडून त्यावर उत्तर आले नाही. दिल्ली महिला आयोगाने यासंदर्भातील पहिले पत्र 8 फेब्रुवारी रोजी पाठवून वसतिगृहांबाबतच्या प्रलंबित प्रस्तावांवरील निर्णय तातडीने घेण्यास सांगितले होते. मात्र, त्यावर काहीच पाऊल उचलले गेले नसल्याने महिला आयोगाकडून ’युजीसी’ला हे समन्स बजावण्यात आले.