Breaking News

मायावती यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, राज्यसभा उपाअध्यक्षांचे आवाहन

नवी दिल्ली, दि. 20, जुलै - बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा असे आवाहन राज्यसभेचे उपाअध्यक्ष पी.जे. कुरियन यांनी  केले आहे. मायावतींनी आपला राजीनामा मागे घ्यावा अशी सर्वांची इच्छा आहे, असे ते म्हणाले.
सहारनपूर येथील हिंसाचाराबाबत संसदेत सुरू असलेल्या चर्चेत बोलू न दिल्याने मायावती यांनी मंगळवारी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र त्यांचा  राजीनामा स्विकारण्यात आला नाही. काही तांत्रिक त्रुटींमुळे त्यांचा राजीनामा स्विकारता आला नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यसभा अध्यक्षांनी  मायावती यांना राजीनामा मागे घेण्याचे आवाहन केले.