Breaking News

एचपीसीएल मधील भागीदारी विकण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ल, दि. 20, जुलै - हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) मधील सरकारी भागीदारी ऑईल ण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनला (ओएनजीसी) विकण्याच्या  प्रस्तावाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
ओएनजीसी हिंदुस्तान पेट्रोलियममधील 51.11 टक्क्यांची सरकारी भागीदारी खरेदी करेल आणि त्यानंतर अतिरिक्त भागीदारीसाठी कंपनीला मागणी करावी लागणार  नाही. हा प्रक्रिया एक वर्षभरात पूर्ण होणे अपेक्षित आहे. ओएनजीसीला भागीदारी दिल्यानंतरही एचपीसीएलचा ब्रँड कायम रहाणार आहे. एचपीसीएल देशातील सर्वांत  मोठ्या तेल उत्पादक कंपनीची उपकंपनी असेल आणि त्यांचे संचालक मंडळही कायम राहील.