Breaking News

भाजप सरकारचा श्रेयवाद सुरु - आ.जगताप

अहमदनगर, दि. 20 - कोळगाव परिसरासाठी आ. राहुल जगताप यांच्या प्रयत्नाने जलयुक्त शिवार योजनेतील विविध कामांसाठी 1 कोटी 84 लाखाचा निधी मिळाला. फक्त घोषणा झाली नाहितर प्रत्यक्ष काम सुरु झाले हे पाहून बबनराव पाचपुतेंचे बगलबच्च्यांना फार दुःख झाले. त्यांनी लगेच पेपरबाजी करुन आ. जगतापांनी याचे श्रेय घेऊ नये हा निधी भाजप सरकारचा आहे. तो भाजपने दिला वैगरे भुलथापा मारुन स्वतःची बडवून घेण्यास सुरुवात केली.
मुळातच आ. जगतापांचे चाललेले काम यांना देखवत नाही. प्रत्येक काम झाले की आमच्यामुळे झाले. भाजपने केले अशी पेपरबाजी करतात. 30-35 वर्षे आमदार, मंत्री राहिलेल्यांच्या बगलबच्चाना हे माहिती पाहिजे की, सरकार हे कोणत्याही पक्षाचे नसते ते जनतेचे असते. पक्ष पार्टी फक्त निवडणुकासाठीच असतात परंतू यांना हे माहित नाही. हे तालुक्याचे दुर्दैव आहे. यांनी 35 वर्षे फक्त घोषणाबाजीत घालविले यांना प्रत्यक्ष काम करणे माहित नाही. राज्य शासनाला महाराष्ट्रातील सर्व जनता कर रुपाने पैसा देत असते हा कर भरताना भाजपचे सरकार आहे. म्हणून फक्त भाजपवाले कर भरत नाही तर विरोधातील (म्हणजे) सर्व जनता कर भरत असते हे यांनी प्रथम ध्यानात घ्यावे.
दुसरे हा निधी त्यांच्या सरकारने दिला असे असेल तर यांच्या काळातील सर्व निधी काँग्रेस राष्ट्रावादीने दिला. याचा अर्थ 30 वर्षे आमदार, मंत्री, पालकमंत्री राहून हे कोरेच राहिले म्हणजे मुक्ताबाईंनी असे सांगितले होते की 1400 वर्षे जगुनही चांगदेव कोराच राहिला. तशीचगत बबनदादांची झाली आहे. तेव्हा अर्ध्या हळकूंडाने पिवळ्या झालेल्या आळपण्यांनी आमदार जगतापांवर टिका करुन लोकांची दिशाभुल करु नये. 288 लोकप्रतिनिधी मिळून सरकार स्थापन होते. आमदार राहुलदादा त्यातील एक आहेत.
हे आळपणे आपली लायकी व योगयता न पाहता कोणावरही टिका करण्याचा प्रयत्न करतात हे अंत्यत दुर्दैव आहे. बबनदादांनी ऊसाचे पेमेंट दिले नाही, कोट्यावधीचे ठिबकचे कर्ज शेतकर्‍यांच्या नावाने काढलेले भरले नाही हे या आळपण्यांना दिसत नाही का? आमदार राहुल जगताप तरूण व उमदे नेतृत्व यांना सहन होत नाही. ते कमी बोलतात पण त्यांचे काम जास्त बोलते. तरी यांनी ध्यानात घ्यावे की, तालुक्यातील लोकप्रिय आमदार अजुन 15 ते 20 वर्षे हटणार नाहीत.