Breaking News

पाचपुते समर्थकांच्या आंदोलनांनंतर सुटलेले घोडचे आवर्तन पुन्हा दोन तासात बंद

अहमदनगर, दि. 20 - हंगेवाडी, वांगदरी, मढेवडगाव, श्रीगोंदा कारखाना, जंगलेवाडी, काष्टी  आदी श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील  घोडच्या लाभ क्षेत्रात पावसाचे प्रमाण जेमतेम असल्याने माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह घोडच्या लाभ क्षेत्रात येणार्‍या शेतकर्‍यांनी घोड धरणावर सकाळी नऊ वाजलेपासून आंदोलनाला सुरुवात करत  आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केले. यात दुपारी एक वाजता घोड कालव्यातून आवर्तन सोडण्यात आले मात्र अवघ्या दोन तासात हे पाणी पुन्हा बंद करण्यात आले. 
श्रीगोंदा तालुक्यात अजूनही पुरेसा पाऊस झाला नाही कुकडीच्या लाभ क्षेत्रातील  श्रीगोंदा तालुक्यात पाऊस  पडला नसल्याने  उसाची पिके  पाण्यावाचून जळत असल्याने घोडच्या लाभ क्षेत्रात येणार्‍या शेतकर्‍यांनी घोड धरणावर जाऊन कालव्याच्या गेट वर सकाळी आंदोलन सुरु केले होते शेकडो शेतकरी जमले  असल्याने या ठिकाणी घोडचे उपअभियंता लंकेश्‍वर यांनी या आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली या ठिकाणी आंदोलक आक्रमक असल्याने पाणी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घोडचे कालव्यातुन  सोडण्यात आले हे पाणी दोन तासात ठाणगे वाडी पर्यंत येऊ पर्यंत हे आवर्तन बंद करण्यात आले.