Breaking News

डोकलामप्रकरणी सर्व देश भारताबरोबर; चीनने सैन्य हटवावे - सुषमा स्वराज

नवी दिल्ली, दि. 21, जुलै - डोकलामप्रकरणी अनेक देश भारताबरोबर आहेत. चीनला कोणत्याच देशाने पाठिंबा दिलेला नाही. चीन व्यतिरीक्त कोणताच देश  डोकलाममधील भौगोलिक परिस्थिती आपल्यानुसार बदलू इच्छित नाही, असे आज परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत सांगितले. 
भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमारेषेवर उद्भवलेला वाद लवकरच सोडवला जाईल. मात्र त्याआधी चीनने आपले सैन्य डोकलाममधून मागे घेतले पाहिजे  असेही स्वराज यांनी नमूद केले.
डोकलामप्रकरणी केंद्राची भूमिका काय आहे? असा सवाल समाजवादीचे खासदार नरेश अग्रवाल यांनी उपस्थित केला होता.