माझ्यावरील जबाबदारी यथार्थपणे पार पाडेन - रामनाथ कोविंद
नवी दिल्ली, दि. 21, जुलै - राष्ट्रपतीपदी निवड झाल्याने माझ्यावर आलेल्या जबाबदारीची मला जाणीव आहे. ही जबाबदारी पार पाडण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन असे उदगार नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले . हा क्षण माझ्यासाठी भावनोत्कट आहे , असेही ते म्हणाले . आपल्या निवडीनंतर बोलताना रामनाथ कोविंद म्हणाले की , डॉ . राजेंद्र प्रसाद , सर्वपल्ली राधाकृष्णन , डॉ . ए. पी. जे . अब्दुल कलाम ,प्रणव मुखर्जी यांच्यासारख्या विद्वान , ज्ञानी व्यक्तींनी जे पद भूषवले , त्या देशाच्या सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी मला मिळाली या बद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो . मला या क्षणी माझे बालपण आठवते आहे . अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मी , माझया भावंडांनी शिक्षण घेतले . अत्यंत सामान्य स्थितीतील माझयासारखा माणूस या देशाचा राष्ट्रपती होऊ शकतो हेच या देशाच्या लोकशाहीचे बलस्थान आहे. मला पाठिंबा देणार्या लोकप्रतिनिधींचा आणि राजकीय पक्षांना मी धन्यवाद देतो , असेही ते म्हणाले .