Breaking News

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर संसदेत चर्चा होऊ दिली जात नाही - राहुल

जयपूर, दि. 20, जुलै - शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर विरोधकांना संसदेत बोलूच दिले जात नाही , असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला .  राजस्थानातील बनासवाडा येथे शेतकर्‍यांच्या मेळाव्यात बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली . ते म्हणाले की , देशभरातील  शेतकरी सध्या अत्यंत वाईट अवस्थेतून जातो आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे . या स्थितीवर लोकसभेत चर्चा घडवून  आणण्याची आमची इच्छा होती . मात्र संसदेत आम्हाला बोलण्याची परवानगी दिली जात नाही . जीएसटी वर चर्चा करण्यासाठी संसदेचे खास अधिवेशन मध्यरात्री  भरविले जाते . मात्र शेतकर्‍यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेत सत्ताधारी पक्ष वेळ देत नाही . शेतकरी , कामगार , छोटे व्यापारी या सारख्या वर्गाचा आवाज  सरकारला दाबून टाकायचा आहे , असा आरोपही त्यांनी केला.