Breaking News

ज्ञानेश्‍वर दूध संस्थेवर शेतकरी विकास मंडळाचे वर्चस्व

अकोले, दि. 20 - तालुक्यातील प्रवरा विभागात अग्रगण्य समजल्या जाणार्‍या सुगाव खुर्द येथील ज्ञानेश्वर सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या संचालक मंडळाच्या  निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सत्तारूढ शेतकरी विकास मंडळाने विजय संपादन केला. विरोधी लोकजागृती मंडळातुन निवडणूक लढावीणार्‍या संस्थेच्या तीन  संचालकांना सभासदांनी घरचा रस्ता दाखवत धोभीपछाड केले.
ज्ञानेश्वर दूध संस्थेच्या संचालक मंडळाच्या तेरा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी भटक्या विमुक्त जाती जमाती ची एक जागा रिक्त  राहिली.उर्वरित बारा जागांसाठी 34 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.पैकी छाणणीत दोन अर्ज अवैध ठरले.21 जणांनी अर्ज माघारी घेतले.तर महिला राखीव मतदार  संघातून सौ.विमल सोपान वैद्य व सौ.चंद्रकला सुनील वैद्य तसेच इतर मागासवर्ग मतदार संघातून सतीश  पुंजा वैद्य हे सत्तारूढ मंडळाचे उमेदवार बिनविरोध  निवडून  आले. मंडळाने बिनविरोध मध्येच विजयाचे खाते खोलले होते.
सत्तारूढ शेतकरी विकास मंडळाने उर्वरित सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले तर विरोधी लोकजागृती मंडळाला सर्व जागांवर उमेदवार उभे करण्यात अपयश  आले. नऊ जागांसाठी तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यासाठी मंगळवारी निवडणुक पार पडली. त्यामध्ये शेतकरी विकास मंडळाचे सर्वचे सर्व उमेदवार  चांगल्या मतांनी विजयी झाले. सर्वसाधारण  मतदार संघातील  सत्तारूढ शेतकरी विकास मंडळाचे  विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे (कंसात त्यांना मिळालेली मते)-  गुळवे अशोक सीताराम(105), डॉ. वैद्य धनंजय ज्ञानदेव (104), वैद्य दयानंद नामदेव (96), वैद्य नामदेव शिवराम(94), वैद्य प्रभाकर रंगनाथ(101), वैद्य प्रेम  तुकाराम(110), वैद्य शांताराम रघुनाथ (100) वैद्य विलास शांताराम(100)  विरोधी  लोकजागृती मंडळाचे पराभूत उमेदवार पुढीलप्रमाणे- नेहे बाळासाहेब  वसंत(66), वैद्य भगवंता किसन(59), वैद्य नामदेव ज्ञानदेव (61) अनुसूचित जाती /जमाती मतदार संघातून पवार संतोष बाबुराव (89) यांनी विरोधी मंडळाचे  पवार रविंद्र दादाभाऊ (58)यांना पराभवाची धूळ चारली. विजयी उमेदवारांत माजी चेअरमन डॉ. धनंजय वैद्य व दयानंद वैद्य यांचा तर पराभूतांमध्ये मावळते  संचालक बाळासाहेब नेहे, नामदेव वैद्य व रविंद्र पवार यांचा समावेश आहे.
सत्तारूढ शेतकरी विकास मंडळाचे नेतृत्व सरपंच महेशराव वैद्य, ज्ञानेश्‍वर दूध संस्थेचे संस्थापक माधवराव वैद्य, पं. स. चे माजी उपसभापती संतोषराव देशमुख,  राष्ट्रवादी चे नेते वकील बाळासाहेब वैद्य, सचिन वैद्य, विकास सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब वैद्य, जेष्ठ संचालक भाऊसाहेब वैद्य, दूध संस्थेचे माजी चेअरमन  रोहिदास वैद्य ,माजी उपसरपंच अमोल वैद्य आदींनी केले.निवडणूक निकाला नंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची मुक्त उधळण करत आपला  आनंद साजरा केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस एच भांगरे यांनी तर केंद्रप्रमुख म्हणून आर एस जोशी यांनी काम पाहिले.त्यांना बी आर गजे, सुनील  भांगरे, संदीप आरोटे, किरण देशमुख, प्रशांत देशमुख, सौ.शिला सहाणे, संस्थेचे सचिव सुरेश कोटकर, सहसचिव लक्ष्मण वैद्य यांनी मदत केली.पोलीस निरीक्षक  अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. सुखदेव खेमनर व पो. कॉ. अशोक कोळगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नूतन संचालक मंडळाचे सर्वत्र  अभिनंदन होत आहे.