Breaking News

पाठपुराव्यामुळेच घोड कालव्याची दुरुस्ती सुरु

अहमदनगर, दि. 20 - घोड धरणाच्या मुख्य कालवे चाळीस कोटींचा निधी येऊनही दुरुस्त होऊ शकले नाहीत. अनेक वर्षे कालवे दुरुस्त नसल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यातच पहिला निधी पडला पण त्याचा उपयोग झाला नसला तरी त्यावर दुसरा निधी पडणार नसल्याचे लक्षात घेऊन आपण सरकारकडे पाठपुरावा करून घोड कालव्याची दुरुस्ती सुरू केली आहे.  कालवा दुरुस्तीसाठी 11 पोकलँड, 4 जेसीबी मशीनच्या साह्याने हे काम सुरू आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील घोड कालव्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे-झुडपे उगवलेली आहेत. काहि भागात मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होतो. सध्या पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई जाणवते अशा परिस्थितीत जर पाण्याचा अपव्यय झाला तर शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुसकान होते. ही बाब लक्षात घेवून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी व शेतकर्‍यांना पाण्याचा पुरेपुर फायदा होण्यासाठी कॅनॉल मधी काटेरी झाडे-झुडपे व गाळ काढणे गरजेचे होते. ही बाब लक्षात घेवून आपण विशेष प्रयत्नातून घोड कॅनॉल च्या दुरुस्तीचे काम आज सुरू करण्यात आले. यामध्ये गाळ काढणे, भराव करणे व काट्या काढण्यात येणार आहेत. या कामासाठी 11 पोकलेन  4 जेसीबी मशीन द्वारे हे सुरु करण्यात आलेले आहे. आपण क्षेत्रीय कर्मचारी व अधिकार्‍यासमवेत घोड डावा कालवा कि. मी.क्र.4 येथील यांत्रिकी विभागाद्वारे कालव्याच्या पुर्नस्थापनेच्या कामाची पाहणी केली यावेळी उपअभियंता प्रकाश लंकेश्‍वर साहेब, शाखा अभियंता, वाघुले, शिरवाळे व पालवे,  शहाजी गायकवाड ,भैय्या वाबळे ,कुमार लोखंडे ,मनिष गायकवाड आदि उपस्थित होते.