Breaking News

नांदेड जिल्हयात समाधानकारक पाउस तर शहरात घराघरात पाणी शिरले

नांदेड, दि. 20, जुलै - नांदेड जिल्ह्यात मंगळवार 24 तासात सरासरी 8.93 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात एकुण 142.86  मिलीमीटर पाऊस झाला आहे.तर मुसळधार पावसाने सिडको परिसरातील संभाजी चौक व विजयनगर, दत्तनगर, राहूलनगर परिसरासह अनेक ठिकाणी पाणी  शिरल्याने परिसर चिखलमय झाला तर अनेक नागरिकांना घरातील पाणी स्वत: हून काढून घ्यावे लागले. अनेक भाग सखलमय असल्याने रोडवरुन आलेले पाणी थेट  वसाहतीमध्ये घुसल्याने अनेक घरे पाण्याखाली वेडली गेली तर रस्ताच्या लगत असलेल्या नाल्या तुंबल्यामुळे कच-यासह पाणी रोडवरुन व थेट घरांमध्ये गेले.  परिसरात मल्लनिसारणाच्या नावाखाली रस्ते व अंतर्गत रस्ते(फुटपाथ) फोडल्याने या मुसळधार पावसाने हाहाकार उडाला. सुमारे 02 ते 03 तास झालेल्या पावसामुळे  अनेक नागरी वसाहतीमध्ये पाणी घुसले. तर प्रभाग क्र.39 मधील जवळपास 300 ते 400 घरात रोडवरील पाणी घरात घुसले अनेक संसार उपयोगी वस्तूची नासधुस  झाली. मनपाच्या सभापती सौ.मंगला देशमुख, उपसभापती डॉ.ललीता शिंदे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष जाऊन पाहणीही केली. अखेर दुस-या दिवशी  सभापती मंगला देशमुख यांनी मनपा आयुक्त यांचेकडे परिसराची पाहणी केली.
उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी तात्काळ जेसीबी द्वारे अनेक ठिकाणी रस्त्यावरुन येणारे पाणी पाईपलाईनद्वारे काढून टाकण्याचे सूचना दिल्या तर सखल भागातील  पाणीही निपटारा करण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या. परिसराची पाहणी केल्यानंतर अनेक ठिकाणी प्रशासनाच्या अधिका-यांना  मलनिस्सारणच्या नावाखाली खोदण्यात आलेल्या रस्त्यामुळे व अंतर्गत टाकलेल्या लाईनमुळे झालेल्या पावसाचे चिखलमय परिसराची झालेली परिस्थिती संतप्त  महिलांनी दाखवली.