Breaking News

प्रकाश आमटेंचे कार्य सर्वांना प्रेरणादायी : कोल्हे


कोेपरगांव : गडचिरोली सारख्या दुर्गम भागात डॉ.प्रकाश आमटे यांनी वडील बाबा आमटे यांच्या संस्कारातून स्वतःला घडवत आदिवासी नागरिकांना विकासाच्या प्रकाशवाटा दाखविण्यांचा जो विडा उचलला आहे, तो खरोखरच सर्वांना प्रेरणादायी आहे. तरूणांनी त्यांची ही वाट आपापल्या भागात प्रत्यक्षात कृतीत उतरविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे प्रतिपादन साईबाबा संस्थानचे विश्‍वस्त आणि विष्वस्थ व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.लोकबिरादरी प्रकल्पाचे जनक पदमश्री डॉ प्रकाश बाबा आमटे यांची कोल्हे यांनी नुकतीच भेट घेतली. त्यांच्या सर्व सामाजिक कार्याची स्वतः माहिती घेतली. त्याप्रसंगी त्यांनी हे आवाहन केले.

डॉ. प्रकाश आमटे यांनी गडचिरोली जिल्हयातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प स्थापन करून त्या माध्यमांतून आदिवासी नागरिकांना वैद्यकिय उपचार दिले. त्यांच्या गोर गरीब मुला मुलींना शैक्षणिक क्रांतीचे धडे देत संस्कारक्षम नागरिक घडविण्यासाठी जीवाचे रान करतात. आदिवासी मंडळींनी जखमी स्थितीत आणून दिलेल्या हिंस्त्र अति हिंस्त्र प्राणी वन्यजीव यावर ते स्वतःच उपचार करतात. त्यांना पुन्हा निसर्गाच्या कुशीत सोडतात याबाबतची सर्व माहिती बिपीन कोल्हे यांनी जाणून घेतली.