साध्वी प्रज्ञा सिंगच्या जामीनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
नवी दिल्ली, दि. 21, जुलै - 25 एप्रिल रोजी न्यायालयाकडून साध्वी प्रज्ञा यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यांच्याविरोधातील मोक्काही हटवण्यात आला होता. त्यामुळे मोक्का अंतर्गतच्या सर्व पुरावेही खटल्यातून काढण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने तेव्हा त्यांना आवश्यकतेनुसार राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही दिले होते. प्राथमिक माहितीनुसार प्रज्ञा यांच्याविरोधात खटला चालवला जाऊ शकत नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते.