Breaking News

शासकीय कन्या शाळेत महिला संरक्षण कार्यक्रमाचे प्रशिक्षण संपन्न

नाशिक, दि. 22 - शासकीय माध्यमिक कन्या विद्यालय, नाशिक व के.जी.बी.बी. स्कुल, नाशिक येथे महिला संरक्षण कार्यक्रमांतर्गत 19 जून ते 23 जून 2017 या  कालावधीत पाच दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याची माहिती चौधरी, मुख्याध्यापिका, शासकीय माध्यमिक कन्या विद्यालय, नाशिक यांनी दिली.
चौधरी म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला संरक्षण कार्यक्रमाजिल्हा परिषद नाशिक मार्फत पाच दिवसांचे प्रशिक्षण उदघाटनाचा  कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी राज्य महिला आयोगाचे सदस्य लक्ष्मण मानकर, विष्णू शेवाळे उपस्थित होते. यावेळी संकेत चंद्रमोरे व अर्चना देशमुख,  जिल्हा प्रशिक्षणार्थी व पिंगाळकर जिल्हा समन्वय विस्तार अधिकारी यांनी महिला संरक्षणाचे सुंदर प्रात्यक्षिके मुलींना दाखविले.
कार्यक्रमास दिपककुमार मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.नाशिक, प्रविण अहिरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती  चौधरी यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार पवार यांनी मानले.