Breaking News

विदेशी पर्यटकांसाठी ‘मुंबई’ सर्वात महाग

नवी दिल्ली, दि. 22 - भारतात पर्यटन करण्यासाठी येणा-या विदेशी नागरिकांच्या दृष्टीने मुंबई सर्वाधिक खर्चिक शहर आहे. पॅरिस, कॅनबरा, सिएटल आणि व्हियेना  या शहरांच्या तुलनेत मुंबईमध्ये अधिक खर्च होतो. एका अहवालानुसार, 23 वर्षामध्ये केलेल्या सर्व्हेक्षणाप्रमाणे विदेशी नागरिकांसाठी महागड्या शहरांच्या यादीत मुंबई  57 व्या स्थानावर आहे. तर शहरांच्या यादीत दिल्ली 99व्या , बंगऴुरु 135 व्या तर कोलकाता 184 व्या स्थानावर आहे.