Breaking News

पाकिस्तानमध्ये तेल टँकर उलटून झालेल्या अपघातातील आणखी दहा जखमींचा मृत्यू

लाहौर, दि. 30 - पाकिस्तानमध्ये तेल टँकर उलटून लागलेल्या आगीत जखमी झालेल्या आणखी 10 जणांचा आज मृत्यू झाला. आता या घटनेत मृतांची संख्या  175 वर पोहोचली आहे. लाहौर, मुल्तान आणि फैसलाबाद बर्न सेंटरमध्ये या दहा जणांवर उपचार सुरू होते. जवळपास 60 पेक्षा अधिक जण गंभीररित्या जखमी  असल्यामुळे मृतांच्या संख्येत आणखी वाढ होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या 60 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जागेच्या कमतरतेमुळे जखमींना  एकत्र ठेवण्यात आले आहे. टँकर चालकाचा मृत्यू बुधवारी झाला. चालक 90 टक्के भाजला असल्यामुळे त्याची साक्ष नोंदवता आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील बहावलपुर जिल्ह्यातील महामर्गावर रविवारी तेलाचा टँकर उलटला. यामुळे स्फोट झाला होऊन भीषण आग लागली होती. यात  150 जणांचा मृत्यू झाला होती. तर 140 जण जखमी झाले होते.