Breaking News

संयुक्त राष्ट्र संघाच्या कोषागारात भारताकडून 1 लाख डॉलरचे योगदान

नवी दिल्ली, दि. 30 - संयुक्त राष्ट्र संघाच्या न्यास कोषागारात भारताने 1 लाख डॉलरचे योगदान दिले आहे. हा कोष विकसनशील देशांच्या कर मुद्यावर विचार  करण्यात भागीदारीत मदतीसाठी आहे. यामध्ये योगदान देणारा भारत हा पहिला देश बनला आहे. संयुक्त राष्ट्र संघांतर्गत आर्थिक व सामाजिक विषयाशी संबंधित  कार्यालयाने ही माहिती दिली आहे.
हा कोष कर विषयावर आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी विशेतज्ञांच्या समितीला त्यांच्या कामात मदत मिळणार आहे. संयुक्त राष्ट्र संघ व विशेषज्ञांच्या समितीने स्वेच्छेने  योगदान देण्याची मागणी केली होती.