Breaking News

‘जीएसटी’च्या विशेष कार्यक्रमावर काँग्रेसचा बहिष्कार

नवी दिल्ली, दि. 30 - काँग्रेसने संसदेत मध्यरात्री होणार्‍या वस्तू आणि सेवा करच्या विशेष कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यरात्री होणा-या  वस्तू आणि सेवा करच्या विशेष कार्यक्रमात आम्ही सहभागी होणार नाहीत. काँग्रेसने यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे, असे पक्षाचे नेते सत्यव्रत चतुर्वेदी  यांनी सांगितले. या आधी या कार्यक्रमावर तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक पक्षाने बहिष्कार घातला होता. आता तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक पक्षाच्या पाठोपाठ काँग्रेसनेही  बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला.
या कार्यक्रमात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विशेष अतिथी म्हणून बोलावण्यात आले आहे. मनमोहन सिंग, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे एकाच व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत.