Breaking News

संगमनेरात दारु अड्ड्यांवर पोलिसांचा छापा 27 हजाराच्या मुद्देमालासह तिघांना अटक

संगमनेर, दि. 22 - शहरातील विविध भागात छापे टाकत पोलिसांनी सुमारे 27 हजार रुपये किमंतीच्या देशी-विदेशी दारुच्या बाटल्यांसह मादक ताडीचा साठा जप्त  केला आहे. यातील दोषी तिघांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात दारु विक्रीवर बंद असतांना शहरात मात्र मोठ्या प्रमाणावर अवैध दारुंच्या अड्ड्यांतून दारु विक्री केली जात आहे. जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा  यांनी जिल्ह्याचा पदभार स्विकारताच प्रथम अवैध दारु विक्री करणारांवर लक्ष केंद्रीत केले. जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांना त्यांनी भेटी देवून अवैध दारु  व्यवासायीकांवर धडक छापा मोहिम राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे गुन्हेगारीवर अंकुश मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असून त्यानुसार जिल्हाभर छापा सत्र  सुरु आहे. ही मोहीम शहरातही पोलीस उपाधिक्षक अशोक थोरात, पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे.
सोमवारी सायंकाळी 4 वाजेपासून शहर पोलिसांनी शहरातील विविध भागात अवैध दारु अडड्यांवर छापे टाकले. जवळपास 27 हजार रुपये किंमतीच्या 163 देशी-  विदेशी दारुच्या बाटल्यासह मादक ताडीने भरलेला ट्रम पोलिसांनी हस्तगत केला. या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद अशोक गाडेकर, सागर दत्तात्रय धुमाळ,  पोलीस नाईक रमेश महादेव लबडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर येथील संतोष जानु आव्हाड (वय 38), शंकर गायकवाड 937) व राजेंद्र भिकाजी  मंडलिक (वय 24) यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 62, 63, 64/2017  नुसार मुंबई पोलीस अ‍ॅक्ट 65 (ई) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. अधिक  तपास सहाय्यक फौजदार ढोसे करीत आहेत.