मनपामध्ये भाजप-राष्ट्रवादीची समिती सदस्य निवडीवरुन नाराजी
भाजपची सत्तेतुन बाहेर पडण्याची तयारी
भाजप आणि राष्ट्रवादी सदस्यांचा राजीनामा
दिपाली बारस्कर यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा
गटनेते कोण ताळमेळ लागेना परस्थिती
अहमदनगर, दि. 22 - महापालिकेच्या स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समिती सदस्य निवडीवरुन नाराजी नाट्य सुरु झाले असून महापौर सुरेखा कदम यांनी निवड जाहीर केलेल्या भाजपा तसेच राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभागृहातच आपला राजीनामा जाहिर केला. तर काँग्रेसचे गटनेते संदिप कोतकर यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिला असल्याने दोन्ही समित्यामधील काँग्रेसच्या सदस्यांच्या जागा रिक्त ठेवण्याचा निर्णय महापौर कदम यांनी घेतला.मनपाच्या स्थायी समितीच्या रिक्त असलेल्या 8 आणि महिला व बालकल्याण समितीच्या 16सदस्यांच्या निवडीसाठी बुधवारी (दि.21) दु.महासभा झाली. या सभेत अपेक्षेप्रमाणे गोंधळ झाला. सभेत महापौर सुरेखा कदम यांनी मनपा निवडणुकीनंतर प्रथम झालेल्या गटनोंदणीनुसार गटनेत्यांच्या शिफारशी स्वीकारल्या, नव्या गटनेत्यांनी दिलेले पाकिटे उघडुनही पाहण्याची तसदी त्यांनी घेतली नाही.
महापौरांनी महिला व बालकल्याण समितीच्या निवडी जाहिर केल्यानंतर मनिषा बारस्कर, शालन ढोणे, राष्ट्रवादीच्या निता घुले, इंदरकौर गंभीर यांनी व्यासपिठासमोर येवुन या निवडी आम्हाला मान्य नसल्याचे सांगत आम्ही आमच्या सदस्यत्वारे राजीनामे देत असल्याचे सुनावले.