Breaking News

नागपुरात मुसळधार पावसाची हजेरी

नागपूर, दि. 28 - मराठवाडा वगळता राज्यभरात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. नागपुरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहामुळे अनेक ठिकाणी  रस्त्यावर पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे अनेक वाहनांचेही यात मोठे नुकसान झाले आहे. आज सकाळी येथे सकाळी 111 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात  आली. 
पावसामुळे छत्रपती नगर, नरेंद्र नगर, मनिष नगर आणि त्रिमूर्ती नगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून अनेक घरांमध्ये पाणी शिरले असल्याचे सांगण्यात येत  आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही चांगला पाऊस पडल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. पुढील दोन ते तीन दिवस नागपुरात असाच पाऊस पडेल अशी  शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.