Breaking News

अश्‍लील चित्रफित प्रकरणी जयसूर्याची अध्यक्षपदावरून हकालपट्टी?

कोलंबो, दि. 02 - आपल्या घटस्फोटीत पत्नीची अश्‍लील चित्रफित प्रसिद्ध केल्याप्रकरणी श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या याची निवड समिती  अध्यक्षपदावरून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वीची ही अश्‍लील चित्रफित चित्रीत करण्यात आली होती. ती काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांमध्ये  व्हायरल झाली. या चित्रफितीमुळे श्रीलंका क्रिकेट मंडळाची आणि देशाची प्रतिमा मलीन झाली आहे, असे मत मंडळाच्या पदाधिका-यांकडून व्यक्त करण्यात येत  आहे. त्यामुळे जयसूर्याला पदावरून पायउतार होण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे. आपल्याला बदनाम करण्यासाठी जयसूर्याने हेतुपूर्वक ही चित्रफीत प्रसिद्ध  केल्याचा आरोप त्याच्या घटस्फोटीत पत्नीने केला होता.
जयसूर्या श्रीलंका निवड समितीचा अध्यक्ष असून त्याला मुदतवाढ देण्यासाठी मंडळ अजिबत इच्छुक नसल्याची चर्चा आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धा संपल्यानंतर  जयसूर्या पदाचा राजीनामा देईल किंवा त्याला मुदतवाढ न देता त्याची हकालपट्टी करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.