Breaking News

रामचंद्र गुहा यांचा प्रशासकीय समिती सदस्यपदाचा राजीनामा

नवी दिल्ली, दि. 02 - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रशासकीय समितीचे सदस्य ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी आज वैयक्तिक कारणांमुळे आपल्या  पदाचा राजीनामा दिला. सदस्यपदाच्या जबाबादारीतून मुक्त होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून गुहा यांनी परवानगीदेखील मागितली आहे.
लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मंडळावर प्रशासकीय समितीची नियुक्ती केली होती. त्यात गुहा यांच्यासह महिला क्रिकेट  संघाच्या महिला संघाच्या माजी कर्णधार डायना एडल्जी, ‘आयडीएफसी’चे व्यवस्थापकीय संचालक विक्रम लिमये आणि ‘कॅग’चे माजी प्रमुख विनोद राय यांचाही  समावेश आहे. 30 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने या समितीची मंडळावर नियुक्ती केली. लोढा समितीच्या शिफारशींची संपूर्ण अंमलबजावणी होईपर्यंत मंडळाचे  दैनंदिन व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी या समितीकडे सोपवण्यात आली आहे.