Breaking News

जीएसटी अंमलबजावणीतील तक्रारी दूर करण्यासाठी वॉर रूम

नवी दिल्ली, दि. 29 - वस्तू व सेवा कर 1 जुलैपासून देशभरात लागू केला जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विविध स्तरावर येणा-या तक्रारी दूर करण्यासाठी वॉर रूम  तयार करण्यात आली आहे. केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळांतर्गत जीएसटी फिडबॅक ण्ड क्शन रूम (वस्तू व सेवा प्रतिसाद आणि कार्यवाही कक्ष) बनवण्यात  आली आहे, अशी माहिती केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळाचे प्रमुख वनाजा एन. सरना यांनी दिली.
याशिवाय ही कर प्रणाली लागू झाल्यानंतर उद्भवणा-या समस्यांसाठीही आणखी एक छोटी वॉर रूम ही तयार केली आहे. या वॉर रूममध्ये अनेक फोन व संगणक  प्रणाली उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्याच्या व्यवस्थापनासाठी संगणक तज्ञ तरुणांचीही नियुक्ती केली जाणार असल्याचेही सरना यांनी सांगितले.
या वॉर रूम च्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारांच्या अधिका-यांना कोणतीही समस्या उद्भवली, तर त्यावर तात्काळ उपाययोजना देण्याचे काम केले जाणार आहे.  हा कक्ष सकाळी 8 वाजता सुरू होईल. देशाच्या इतिहासात प्रथमच लागू केल्या जाणा-या या कर प्रणालीत ज्या समस्या येतील. त्या सोडवण्यासाठी एक खिडकी  योजनेप्रमाणे हे काम करणार आहे. या कक्षातून सर्व प्रकारच्या प्रक्रियांवर लक्ष ठेवले जाणार आहे. जेणेकरून कोणतीही समस्या निर्माण होऊ नये.