Breaking News

रद्द तिकिटांतून रेल्वेला 14 अब्ज रुपयांची कमाई

नवी दिल्ली, दि. 29 - आरक्षित केलेली रेल्वे प्रवास तिकिटे रद्द केल्याने 2016-17 मध्ये रेल्वेला 14 अब्ज 7 कोटी रुपयांची कमाई झाली आहे, अशी माहिती  माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जाच्या उत्तरातून समोर आली आहे.
मध्य प्रदेशमधील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांना माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जाच्या उत्तरात रेल्वे मंत्रालयाच्या माहिती प्रणाली केंद्राने  ही माहिती दिली आहे. 2015-16 च्या तुलनेत 2016-17 मध्ये 25.29 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2015-16 मध्ये 11 अब्ज 23 कोटी रुपये, 2014-15  मध्ये 9 अब्ज 8 कोटी रुपये व 2013-14 मध्ये 9 अब्ज 38 कोटी रुपये रेल्वे मंत्रालयाला प्राप्त झाले आहेत. याशिवाय अनारक्षित तिकिटे रद्द केल्याने 2012-13  मध्ये 12 कोटी 98 लाख रुपये, 2013-14 मध्ये 15 कोटी 74 लाख रुपये, 2014-15 मध्ये 14 कोटी 72 लाख रुपये, 2015-16 मध्ये 17 कोटी 23 लाख  रुपये व 2016-17 मध्ये 17 कोटी 87 लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.