Breaking News

नाशिकमध्ये हॉट्स ऍप खाते हॅकिंगच्या सायबर पोलिसांकडे तक्रारी

नाशिक, दि. 29 - नाशिकच्या सायबर विभाग पोलिसांकडे हॉट्स ऍप हॅकिंगच्या 20 तक्रारी प्राप्त झाल्या असून हॉट्स ऍप खाते वापरणार्‍या नागरिकांनी आपल्या  हॉट्स ऍप खात्याविषयी तांत्रिक माहिती इतरांना शेअर करू नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
नाशिक पोलिसांकहन करण्यात आले आहे की, गेल्या दोन दिवसापासून शहरातील वेगवेगळ्या ग्रुपमधील नागरिकांचे हॉट्स ऍप खाते कोणत्यातरी अज्ञात व्यक्ती कडून  हॅक होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे.
सदर व्यक्ति हॉट्स ऍप खाते हॅक केल्यानंतर सदर व्यक्तिच्या हॉट्स ऍप खात्यामधील ओटीपी जनरेट करुन इतर लोकांकडे सदर ओटीपीची मागणी करत आहे. सदर  आरोपी ओटीपी मिळताच हॉट्स ऍप खाते हॅक होऊन जात आहे.
याबाबत डॉ.गौरी पिप्राळेकर व निलेश दाते यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.याबाबत पोलीस पुढील तपास पूर्ण करत असून नागरिकांनी आपल्या हॉट्स ऍप  खात्याविषयी तांत्रिक माहिती कोणाला देऊ नये असे आवाहन नाशिक सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.