Breaking News

शिष्यवृत्ती परिक्षेत भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयाचा विद्यार्थी राज्यात दुसरा

अहमदनगर, दि. 29 - येथील अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत्र  नेत्रदिपक यश संपादन करुन राज्यात आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे. 5 वी चे 37 विद्यार्थी तर 8 वी मधील 38 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान  पटकाविला आहे. 8 वी मधील प्रतिक संभाजी लगड राज्यात दुसरा आला आहे. 8 वी मधील विद्यार्थी शौनक ऋषीकेश मुजुमदार याने राज्यात सहावा तर जिल्ह्यात  पहिला येण्याचा बहुमान पटकाविला आहे.तसेच सेजल मारुती चेमटे जिल्ह्यात पाचवी व ऋग्वेदा चंद्रशेखर कुलकर्णी जिल्ह्यात सहावी आली आहे. 
संस्थेच्या प्रमुख कार्यावाह छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नियामक मंडळाचे चेअरमन अशोक मुथा,खजिनदार  शरद रच्चा,सुनंदा भालेराव,मुख्यध्यापक उल्हास दुगड,उपमुख्यध्यापक विलास औटी, पर्यवेक्षक सुनिल ख्रिस्ती,संतोष कुलकर्णी,रविंद्र लोंढे आदिंसह मार्गदर्शक शिक्षक  व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या विद्यार्थ्यांना अपर्णा कमलकर,वैशाली मेहेर,मनिषा कांबळे,विद्या ठुबे, प्रगती बेगडे,अतुल बोरुडे,आर.व्ही.कुलकर्णी,शिल्पा  नगरकर आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.छायाताई फिरोदिया यांनी गुणवंत विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणा-या अध्यापकांचे अभिनंदन केले.