Breaking News

घरकुलांच्या उद्दिष्टपूर्तीत संग्रामपूर तालुका जिल्ह्यात अव्वल!

बुलडाणा, दि. 22 - ग्रामीण भागामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अनुसूचित जाती, जमातीमधील बेघर घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही योजना  जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व गटविकास अधिकारी यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. बुलडाणा जिल्हयामधून इतर तालुक्याच्या तुलनेत सन  2016-17 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांची सर्वात जास्त उद्दिष्टपूर्ती संग्रामपूर तालुक्यात होत असून, घरकुलांच्या उद्दिष्टपूर्तीत संग्रामपूर तालुका हा  बुलडाणा जिल्हयामध्ये अग्रेसर आहे.
बुलडाणा जिल्हयातील 13 तालुक्यांपैकी संग्रामपूर तालुक्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांचे सर्वात जास्त उद्दिष्ट मिळाले आहे. तालुक्याला 1 हजार 591  घरकुलांचे उद्दिष्ट असून, घरकुल लाभार्थींंचे 1 हजार 608 घरकुलांच्या कागदपत्राचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन झाले असून, 1 हजार 530 घरकुल लाभार्थींंच्या जागेचे  फोटो अपलोड झाले आहेत. तर 1 हजार 511 लाभार्थींंचे घरकुल मंजूर झाले आहेत. तर 1 हजार 438 घरकुल लाभार्थींंचे बँक खाते लिंक झाले असून, 1 हजार  330 लाभार्थींंंना घरकुलाचा प्रथम हप्ता 30 हजार रुपये प्रमाणे देण्यात आला आहे.
एकूण 1 हजार 330 लाभार्थींंना प्रति घरकुल लाभार्थी प्रथम हप्ता 30 हजार रुपयांप्रमाणे 1 हजार 330 लाभार्थींंंना प्रथम हप्त्याचे वाटप 3 कोटी 99 लाख रुपये  लाभार्थींंंना करण्यात आले आहे तर 71 लाभार्थींंंना 60 हजार रुपये प्रमाणे दुसर्‍या हप्त्याचे वाटपसुद्धा करण्यात आले आहे. यामध्ये एकूण पहिला हप्ता 3 कोटी 99  लक्ष रुपये व दुसरा हप्ता 42 लाख 7 हजार रुपये असे दोन्ही हप्ते मिळून एकूण 4 कोटी 32 लाख रुपये घरकुल लाभार्थींंंना वाटप करण्यात आले आहेत.  जिल्हयातील इतर तालुक्याच्या तुलनेत संग्रामपूर तालुका हा घरकुल लाभार्थींंंना त्यांच्या पहिला हप्ता व दुसरा हप्त्याची रक्कम घरकुल लाभार्थींंंना वाटप करण्यातही  अग्रेसर ठरला आहे. तसेच इतर तालुक्यांना घरकुलाचे उद्दिष्ट कमी आहेत; मात्र सर्वात जास्त ब प्रपत्रामध्ये नावे संग्रामपूरतालुक्यात जास्त आहेत. तसेच घरकुलांचे  उद्दिष्ट पूर्ण करण्यास संग्रामपूर तालुका हा जिल्हयामध्ये अग्रेसर आहे.