पुस्तकांचा विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करुन शाळेचे नाव उज्वल करावे
। विरोधीपक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांचे प्रतिपादन
अहमदनगर, दि. 17 - शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या मोफत पाठ्यपुस्तकांचा विद्यार्थ्यांनी चांगल्यापद्धतीने अभ्यास करुन जास्तीत जास्त गुण संपादन करुन शाळेचे नाव उज्वल करावे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष, विरोधीपक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनी केले.श्री संत सावताश्रम शिक्षण समितीच्या महात्मा फुले विद्या मंदिर येथील शाळेत प्रवेश घेलेल्या मुलांचे गुलाबपुष्प, फुगे व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष,विरोधीपक्ष नेते बाळासाहेब बोराटे, ऋषीकेश आगरकर, परेश लोखंडे, हर्षल म्हस्के, मुख्याध्यापक संजय चौरे, रावसाहेब काकडे आदिंसह शिक्षकवृंद उपस्थित होते.
पुढे बोलताना बोराटे म्हणाले की, संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, त्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा यासाठी शाळेच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जात आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्याचाही प्रयत्न केला जातो, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्तविक रावसाहेब काकडे यांनी केले तर आभार शिदे सर यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
