Breaking News

नूतन निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांचा सत्कार

अहमदनगर, दि. 17 - नूतन   निवासी उप जिल्हाधिकारी  गोपीचंद कदम यांचा   भिंगार कॅन्टों. सदस्या शुभांगी  साठे  यांनी सत्कार केला. याप्रसंगी पाटबंधारे सार्वजनिक बांधकाम पतसंस्थेचे माजी चेअरमन भाऊ कर्डिले, गणेश  साठे, स्वप्नील शेलार आदि यावेळी  उपस्थित होते.
यावेळी शुभांगी साठे म्हणाल्या की, भिंगार परिसारातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत  असून, त्यातील पाणी, लाईट, रस्ते, ड्रेनेज या समस्यां मोठ्या प्रमाणात आहेत. सर्वप्रथम पाणी समस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर आपण स्वत: लक्ष घालून  भिंगारकारांचा अनेक दिवसांचा प्रलंबीत असलेला प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे.
यावेळी गोपीचंद कदम यांनी लवकरच याबाबत कॅन्टोंमेंट बोर्डाचे अधिकारी व पदाधिकांची बैठक बोलावून त्यावर तोडगा काढू असे आश्‍वासन दिले.