Breaking News

व्हिडीओ कॉन्फरसिग द्वारे विद्यार्थीनी लंडन व अमेरिकेत साधला संवाद

अहमदनगर, दि. 17 - माजी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी मांडलेल्या कल्पनेला मुर्तरूप देत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधीकारी रविंद्र बिनवडे यांच्या झेडपी ग्लोबल नगरी या उपक्रमांतगर्त तालुक्यातील मढी व अकोला येथील जि.प. या शाळेकरी मुलांनी शाळेच्या पहिल्या दिवशी अमेरीका ,लंडन मध्ये राहाणार्‍या भुमीपुत्रांशी व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे संवाद साधत माहितीचे आदान -प्रदान केले या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमीक शाळेतील मुलांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी ग्लोबल वातावरण अनुभवले .
तालुक्यातील सोमठाणे येथील भुमीपुत्र डॉ.मनोज जोशी अमेरीकेत स्थायीक झाले असुन नॉनो तंत्रज्ञान या विषयात त्यांनी पि.एचडी मिळवली आहे.जिल्हातील 14 तालुक्यामधुन 28 शाळा अशा उपक्रमासाठी निवडण्यात आल्या तालुक्यातील मढी व शेकटे येथील शाळामधुन विदयार्थांचा स्वागततासाठी असे उपक्रम राबवले गेले शेकटे येथील शाळेत विदयार्थींनी लंडनमध्ये स्थायीक झालेल्या लक्ष्मण खाडे यांचेशी संवाद साधला त्यांचे मुळ गाव पाथर्डी तालुक्यातील जोगेवाडी असुन लंडन मधील मोठया कंपन्याशी संपर्क साधत समुपदेशाचे काम करतात जिल्हा परिषदेचा शांळाचा पहिला दिवस अशा अगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे विदयार्थासाठी खुपुच वेगळे अनुभव ठरले मढी येथील विदयार्थांनी अमेरीकेतील भुमीपुत्राशी संवाद साधला त्यावेळी रात्रीचे दोन वाजले होते गावकडच्या मुलांशी मराठीत बोलायला मिळणार म्हणुन जोशी यांनी अख्खी रात्र डोक्यावर घेत तब्बल दोन तास चर्चा केली या वेळी  विदयार्थांशी संवाद साधत जोशी म्हणाले की विद्यार्थांना नवनविन तंत्रज्ञाण विषयी कोन तिही माहिती विचारा .इटरनेटद्वारे त्वरीत उपलब्ध करुण देईल खुप .शिका ज्ञान संपन्न बनण्यातला आंनद वेगळाच असतो पैशा पेक्षा ज्ञान व सेवा श्रेष्ठ आहे नगरच्या जिल्हा परिषदेमुळे आमच्या काळातील गावाकडचे शिक्षणाचे चित्र डोळ्यासमोर आले . जिल्हा परिषदच्या शाळा खरोखरच खुप सशक्त व उपक्रमशील आहेत तेथे शिकणारीमुले अंहकारापासुन दुर असतात .विदयार्थींनी तिकडील माहिती समाज जिवण आदिची माहिती घेतली.