Breaking News

कुलभूषण जाधव प्रकरणात पुनर्विचार होण्याची शक्यता ?

नवी दिल्ली, दि. 21 - कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेचा पुनर्विचार होण्याची शक्यता आहे असे वक्तव्य पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केले आहे. बासित  यांनी जाधव प्रकरणात महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
कुलभूषण जाधव प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात आहे, तोपर्यत जाधव यांना फाशी देण्यात येणार नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय येईपर्यत दोन-तीन वर्षही  लागतील. मात्र, न्यायालयाच्या निर्णयापूर्वी जाधव यांना फाशी देता येणार नाही. तसेच न्यायालयाचा निर्णय लवकर यावा अशी इच्छा असल्याचेही बासित यांनी  सांगितले.
आंतरराष्ट्रीय न्यायालयानिर्णय येईपर्यत फाशीच्या शिक्षेपासून सुटका करण्यासाठी कुलभूषण जाधव त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात अपील करु शकतात. हा  अर्ज न्यायालयाने फेटाळल्यास जाधव पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा आणि राष्ट्रपती ममनून हुसेन यांच्याकडे दयेचा अर्जदेखील करु शकतात, असे केल्यास  या प्रकरणाचा पुनर्विचार केला जाऊ शकतो, असे बासित यांनी सांगितले.