Breaking News

जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये दोन दहशतवादी ठार

श्रीनगर, दि. 21 - जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथे आज सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात  आले. तसेच त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच बारामुला जिल्ह्यात अद्यापही सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.
सोपोरमध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहिम सुरू केली. दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या  जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यास प्रत्युत्तर देतांना दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. सोपोरमध्ये इंटरनेट सेवा  बंद करण्यात आली असून लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे.