राजीव गांधी हत्याकांडातील आरोपीची तामिळनाडू सरकारकडे दया मरण देण्याची मागणी
चेन्नई, दि. 23 - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांड प्रकरणात कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी रॉबर्ट पायस याने तामिळनाडू सरकारला पत्र पाठवून दया मरण देण्याची मागणी केली आहे. आपल्याला दयामरण देऊन आपले पार्थिव कुटुंबियांकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी पायस याने मुख्यमंत्री पलानीस्वामी यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. पायस याने पुझल तुरूंग प्रशासना द्वारे तामिळनाडू सरकारकडे ही मागणी केली आहे, अशी माहिती तुरूंगातील एका वरिष्ठ अधिका-याने दिली.
माझ्या जगण्याला आता काहीच अर्थ नाही. गेल्या 26 वर्षांपासून मी तुरूंगात कारावासाची शिक्षा भोगत असून माझी सुटका होईल ही अपेक्षाही आता राहिली नाही. त्यामुळे मला दयामरण देऊन माझे पार्थिव माझ्या कुटुंबियांकडे सोपवण्यात यावे, असे पायस याने म्हटले आहे.