Breaking News

पाणी टंचाईमुळे मध्य प्रदेशच्या सुमावाली वन विभागात 21 मोरांचा मृत्यू

मोरेना, दि. 23 - मध्य प्रदेशच्या मोरेना जिल्ह्यातील सुमावाली वन विभागात पाणी टंचाईमुळे सुमारे 21 मोरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या  घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली असून 21 मोरांचे मृतहेद शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आले आहेत.  अधिकारी या  प्रकरणाचा तपास करत असून खराब झालेले हात पंप ताबडतोब दुरुस्त करण्यात येतील, असे आश्‍वासन उप विभागीय दंडाधिकारी प्रदीप सिंग यांने दिले.
स्थानिक प्रशानसनाच्या निष्काळजीपणामुळे या मोरांचा मृत्यू झाला, असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना वन विभागाच्या  अधिका-याने सांगितले की, अलीकडेच तलावाचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या भागात कमी पाऊस पडत असल्यामुळे पक्ष्यांचा मृत्यू  होत असल्याचा दावा त्या अधिका-याने केला आहे.