ग्रेटर नोएडामध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार करणा-या तीन आरोपींना अटक
ग्रेटर नोएडा, दि. 23 - ग्रेटर नोएडामध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार करुन धावत्या गाडीतून फेकणा-या तीन आरोपींना आज पोलिसांनी अटक केली. हरियाणामधील सोहना येथे महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिला ग्रेटर नोएडामध्ये धावत्या गाडीतून फेकून देण्यात आले होते. ग्रेटर नोएडा येथील कासना पोलीस स्थानकाजवळ ती महिला आढळून आली होती. पीडित महिला गुरूग्राम येथील रहिवासी असून सायंकाळी तिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला धावत्या गाडीतून फेकून देण्यात आले होते.