Breaking News

भारताविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यांसाठी होप, अम्ब्रीसला संधी

अँटिगुआ, दि. 29 - भारताविरूद्ध होणा-या शेवटच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी विंडिजने दोन नवोदित खेळाडूंना स्थान दिले आहे. काईल होप आणि सुनील  अम्ब्रीस या दोघांना संघात स्थान देण्यात आल्याची घोषणा विंडिज क्रिकेट मंडळाच्या निवड समितीकडून करण्यात आली. जोनाथन कार्टर आणि केसरीक विल्यम्स  या दोघांच्या जागी या दोघांना संघात समाविष्ट करण्यात आले आहे. काईल होप हा विंडिजचा कर्णधार शाय होप याचा भाऊ आहे. त्याला फलंदाज म्हणून तर  अम्ब्रीसला यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले आहे.