Breaking News

बिशन सिंग बेदी यांच्या जीवनावर बनणार माहितीपट

नवी दिल्ली, दि. 29 - भारतीय संघाचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांच्या जीवनावर एक माहिती तयार करण्यात येणार असून हा माहितीपट त्यांचा मुलगा  अभिनेता अंगद बेदी बनवणार आहे. बिशन सिंग बेदी यांनी क्रिकेट खेळायला सुरूवात केल्यानंतरचे त्यांचे जीवन आणि त्या आधीचे त्यांचे जीवन या संदर्भात हा  माहितीपट असणार आहे. अंगद स्वत: दिल्ली संघातून 16 आणि 19 वर्षाखालील क्रिकेट संघातून खेळला आहे. त्या वेळच्या त्याच्या वडिलांबरोबरच्या आठवणींचा  अंतर्भावही हा माहितीपटात दिसून येण्याची शक्यता आहे.