वीज पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू
नांदेड, दि. 05 - वादळी वा-यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली असताना शेतात काम करणा-या चार शेतक-यांवर विज पडल्याने दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना नायगाव तालुक्यातील इकळीमाळ येथे घडली. जखमींना पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असुन घटनास्थळी कुंटूर पोलीस व महसूल विभागाचे कर्मचारी पोहोचले आहेत.
नायगाव तालुक्यातील कुंटूर व इकळीमाळ दरम्यान नागोराव बकवाड यांचे शेत असून त्यांच्या शेतातील भुईमूगाच्या पिकाची नुकतीच काढणी झाली असून. पावसाळ्याचे दिवस तोंडावर आल्याने शेतात अस्तव्यस्त असलेले भुईमूगाचे काड एकत्र करुन त्याचा ढग करण्यासाठी बकवाड यांनी शेजारी असलेले गंगाधर गोविंदराव मृदंगे ( 25), शिवाजी गोविंदराव मृदंगे (20) तानाजी रघूनाथ पुयड यांना 3 जून रोजी बोलावून घेतले व चौघे मिळून काड एकत्र करत असताना अचानक ढगाळ वातावरण झाले व वादळी वा-यासह पावसाला सुरुवात झाली. पाऊस येत असल्याने सर्वजन भुईमूगाचे काड जमा केले होते त्याच्याच बाजूला बचावासाठी थांबले असता क्षणात चौघावर विज पडली. यात मयत गंगाधर मृदंगे, शिवाजी मृदंगे हे दोघे सख्खे भाऊ जागीच गतप्राण झाले तर तानाजी पुयड व नागोराव बकवाड हे गंभीर जखमी झाले.
ही घटना गावात समजताच गावकरी शेताकडे धाव घेवून गंभीर जखमी झालेल्या दोघांना तातडीने पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मयत गंगाधर मयत गंगाधर मृदंगे यांचे मागच्याच वर्षी लग्न झाले तर शिवाजी मृदंगे हा अविवाहित होता. या घटनेने इकळीमाळ येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.