मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे नाही - शेतकरी संघटना
लातूर, दि. 05 - शेतक-यांच्या प्रश्नासाठी पाच जून रोजी महाराष्ट्र बंद पाळण्यात येईल, सहा तारखेला सरकारी कार्यालयांना आणि सात तारखेला आमदार-खासदारांच्या घरांना कुलुपे ठोकण्यात येतील. शेतक-यांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही. अशी माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी दिली. शेतक-यांच्या प्रश्नांची फारशी जाण नसलेल्या जयाजी सूर्यवंशी आणि त्यांच्या साथीदारांनी शेतक-यांचा विचारात न घेता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. काही तुटपुंज्या आश्वासनांवर संप मिटल्याचे जाहीर करुन टाकले पण हा प्रयत्न यशस्वी होणार नाही असेही ते म्हणाले.